अशजीत क्रिएशन्स अँड बुटीक मध्ये आम्ही केवळ कपडे शिवत नाही, तर आम्ही एक स्वप्न साकार करत आहोत – मेहनतीने, समर्पणाने आणि संकल्पाने.
अश्विनी आणि सुजीत, बीड येथील प्रेरणादायी जोडपे, यांच्या संकल्पनेतून जन्मलेला अशजीत ब्रँड हे फक्त बुटीक नाही, तर एक चळवळ आहे — जी महिलांना फॅशन आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम करते.
२३ जून १९९२ रोजी जन्मलेली अश्विनी, लहानपणापासूनच डिझाईनच्या क्षेत्रात रस घेऊ लागली. वडिलांनी तिला कॉम्प्युटर शिक्षण द्यायचा निर्णय घेतला होता, पण तिने स्वतःच्या आवडीला प्राधान्य दिलं आणि ड्रेस डिझाईन हे क्षेत्र निवडलं.
तीने गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, पुणे येथून ड्रेस डिझाईन अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग डिप्लोमा पदवी २०११ मध्ये विशेष गुणवत्तेतून पूर्ण केली. नंतर मोठ्या भावाच्या प्रेरणा, शैक्षणिक आणि आर्थिक पाठिंब्याने तिने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून ड्रेस डिझाईन अँड फॅशन कम्युनिकेशन पदवीही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली.
२०१५ मध्ये अश्विनीचं लग्न सुजीत यांच्याशी झालं — जे INFD पुणे येथून टेक्स्टाइल डिझाईन शिकले आणि नंतर B.Com व M.Com पूर्ण केले. अश्विनीच्या कौशल्यावर विश्वास ठेवत, सुजीत यांनी तिला स्वतःचं बुटीक सुरू करायला प्रोत्साहन दिलं. दोघांनी मिळून एका छोट्या दुकानातून सुरुवात केली, आणि ग्राहकांच्या पसंतीने हळूहळू यशस्वी व्यवसायात रूपांतर केलं.
संपूर्ण मेहनतीमुळे, त्यांनी लवकरच १२०० स्क्वेअर फूट व्यापारी जागा भाड्याने घेतली, आणि अद्ययावत मशीनसह बुटीक वाढवलं. १ मार्च २०१९ रोजी, आपल्या मोठ्या मुलगा अवनीश च्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांनी स्वतःच्या मालकीच्या सजवलेल्या जागेत अश्जीत क्रिएशन्स अँड बुटीक आणि Ashjeet ब्रँड ची अधिकृत सुरुवात केली.
कोविड काळात त्यांनी समाजासाठी कापडी मास्क तयार करून खूपच कमी दरात विकले. २०२१ मध्ये दुसऱ्या मुलगा अगस्त्य चा जन्म झाला तरीही अश्विनीने फार कमी विश्रांती घेत काम सुरू ठेवलं.
सुजीत यांनी तिला अजून एक पाऊल पुढे नेण्यास प्रेरित केलं आणि २०२१ मध्ये तिने दयानंद कॉलेज, लातूर येथे MAFD (मास्टर्स इन फॅशन डिझाईन) मध्ये प्रवेश घेतला. तीने कॉलेजमध्ये आणि SRTMU नांदेड विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून पदवी पूर्ण केली.
सुजीत यांचा YouTube चॅनेल — जो बुटीक मॅनेजमेंटसंबंधी आहे — याला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. भारतासह अमेरिका, यूएई, नेपाळ, श्रीलंका, आफ्रिकन देशांतील बुटीक व्यवसायिक यांचं मार्गदर्शन ते करत आहेत.
या लोकप्रियतेच्या जोरावर दोघांनी मिळून Ashjeet Fashion Institute ची स्थापना केली. आजवर:
५०,०००+ विद्यार्थी शिकले
२,००,०००+ ग्राहकांची सेवा केली
अनेक देशांतून मार्गदर्शनासाठी संपर्क केला जातो
अश्विनीला विविध NGO, कॉलेजेस आणि महिला सशक्तिकरण मंचांकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आज ती अनेक फॅशन डिझाईन कॉलेजेसमध्ये गेस्ट लेक्चर आणि मोटिवेशनल सेशन्स घेते, आणि विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देते.